"International Journal of Geography, Geology and Environment"
2024, Vol. 6, Issue 2, Part A
नाशिक विभागातील लोकसंख्या स्थितीचे भौगोलिक विश्लेषण
Author(s): प्रा. डॉ. घोलप एन. एन.
Abstract: महाराष्ट्रातील एक महत्वाचा विभाग म्हणून नाशिक विभाग ओळखला जातो. लोकसंख्येचा अभ्यास करत असताना या विभागात एकूण पाच जिल्हे असून नंदुरबार व धुळे हे दोन जिल्हे जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात आदिवासी लोकसंख्या राहते. या संशोधन पेपर मध्ये एकूण लोकसंख्या मध्ये पुरुष व श्रेयांमध्ये होणारी वाढ कशी आहे याचा अभ्यास करून अशी दिसते की, १९९१ ते २०११ पर्यंत २० वर्षांमध्ये एकूण स्त्रियांचे प्रमाण कमी होताना दिसते. १९९१ च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात जास्त घटत असल्याचे दिसते तर धुळे जिल्ह्यामध्ये हा वेग कमी असल्याचा दिसतो. याचे कारण नाशिक हा औद्योगिक विकसित जिल्हा असल्याने या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने लोकांचे थलांतर येथे होते. २००१ व २०११ जनगणना वर्षांमध्ये धुळे जिल्ह्यात स्त्री व पुरुष यामधील फरक कमी आहे. म्हणजे या या जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण घट अतिशय संथ गतीने होत आहे. २००१ च्या जनगणनेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्त्रियांचे घटीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे कारण १९९८ मध्ये नंदुरबार व धुळे जिल्ह्याची विभागणी झाल्याने झाल्याने बरीचशी लोकसंख्या ही विभागलेली आहे. त्यामुळे ही तफावत निर्माण झालेली आहे. जळगाव या शेतीप्रधान जिल्ह्यात १९९१, २००१ व २०११ या एकूण२० वर्षात या जिल्ह्यातील महिलांचे प्रमाण सातत्याने कमी कमी होत आहे.
Pages: 42-47 | Views: 356 | Downloads: 68Download Full Article: Click Here
How to cite this article:
प्रा. डॉ. घोलप एन. एन.. नाशिक विभागातील लोकसंख्या स्थितीचे भौगोलिक विश्लेषण. Int J Geogr Geol Environ 2024;6(2):42-47.