"International Journal of Geography, Geology and Environment"
2024, Vol. 6, Issue 1, Part B
नंदुरबार जिल्ह्यातील महिला व कुपोषित बालकाच्या समस्यांचे प्रारूप एक अभ्यास
Author(s): मनिषा सुहास रामटेके, विजय ब. खराते
Abstract: भारतात अन्न सुरक्षा समस्येमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाले । भारत आर्थिक विकासाच्या उच्चतम कोटीवर आहे तसेच अन्नधान्य उत्पादनात समाधानकारक वाढ असूनही कुपोषण समस्येचे निराकरण करण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ ठरत आहे । सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये १५.८७ कोटी बालकांपैकी ८.२९ कोटी मुले व ७.८५ कोटी मुली आहे । भारतामध्ये दरवर्षी २.५ कोटी नवीन बालकांचा जन्म होतो । यावरून असे दिसून येते की, भारत जगात सर्वात जास्त बालकांचा देश आहे । जिथे जगातोल प्रत्येक पाचवा बालक देशातील असतो । भारत सरकारद्वारे राष्ट्रीय स्तरावर चालणारे अनेक आरोग्यविषयक कार्यक्रम राबवूनही जगातील कुपोषित बालकांपैकी ६० टक्के कुपोषित बालके भारतात आहेत । जिथे दरवर्षी २५ लाख बालके फक्त कुपोषणामुळे मरतात या कारणास्तव भारत जगातील सर्वाधिक कुपोषित देश असून बांग्लादेश, इथोपिया आणि नेपाळ सोबत उभा असलेला दिसून येतो । शरीराला संपूर्ण पोषक आहार, प्रथिने आणि कार्बोदके आवश्यकतेपेक्षा कमी मिळणे म्हणजे कुपोषण होय ।
मनिषा सुहास रामटेके, विजय ब. खराते. नंदुरबार जिल्ह्यातील महिला व कुपोषित बालकाच्या समस्यांचे प्रारूप एक अभ्यास. Int J Geogr Geol Environ 2024;6(1):84-87. DOI: 10.22271/27067483.2024.v6.i1b.204